
लातूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्यातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या मराठवाड्यातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने सर्वाधिक भाव देणाऱ्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचा ३९ वा बॉयलर अग्निप्रदीपन आणि ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते हा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडेल. आमदार अमित देशमुख, लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुुख यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या ३९ व्या बॉयलर अग्निप्रदीपन व ऊस गळीत हंगाम कार्यक्रमास सभासद, ऊस उत्पादक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे व्हॉईस चेअरमन अशोक काळे, कार्यकारी संचालक पंडित देसाई आणि संचालक मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis