मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ९७ ग्रामपंचायत अधिकार्‍यांना नोटिसा
धुळे, 3 नोव्हेंबर (हिं.स.) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कमी काम असलेल्या ९७ ग्रामपंचायत अधिकार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. पंचायत समिती धुळे येथे झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ९७ ग्रामपंचायत अधिकार्‍यांना नोटिसा


धुळे, 3 नोव्हेंबर (हिं.स.) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कमी काम असलेल्या ९७ ग्रामपंचायत अधिकार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. पंचायत समिती धुळे येथे झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंधरावा वित्त आयोगाची अपूर्ण कामे व अखर्चित निधी याबाबत चर्चा झाली. कमी कामकाज असलेल्या अधिकार्‍यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून सुधारणा न झाल्यास प्रशासकीय कारवाई होणार आहे. तसेच घरकुल योजना लाभाथ्यारनी १० नोव्हेंबरपयरत नोंदणी पूर्ण करावी, आणि अपूर्ण घरकुले ३१ डिसेंबरपयरत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस प्रकल्प संचालक राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, गटविकासअधिकारी गणेश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande