पुणे जि.प. निवडणूक ठरणार शरद पवार गटासाठी अस्तित्वाची लढाई
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अशोक पवार यांचा पराभव करीत आपले अस्तित्व सिद्ध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
ZP pune


पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अशोक पवार यांचा पराभव करीत आपले अस्तित्व सिद्ध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ही निवडणूक शरद पवार गटाच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार असल्याने खासदार अमोल कोल्हेसह जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, माजी आमदार अशोक पवार यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीसह शिरूर तालुक्यातील खरेदी-विक्री संघ निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने आणि कुठली शासकीय समिती कार्यकर्त्यांना सध्या नसल्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परंतु मागील निवडणुकीचा वचपा काढण्याची संधी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळणार असल्याने शरद पवार गटाने मागील महिन्यापासून बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande