
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्हा पुन्हा एकदा निसर्गसंपन्न आणि जलसमृद्ध झालेला आहे. धरण परिसरातून ओसंडून वाहणारे पाणी, नद्या-नाल्यांमधील वाढलेला प्रवाह आणि हिरवाईची भरभराट यामुळे जिल्ह्यात पावसाळ्याची खरी मजा अनुभवायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सोळा धरणे काठोकाठ भरल्याने जिल्हा जलसंपत्तीने समृद्ध झाला असून, पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे.जिल्ह्यात यावर्षी मॉन्सून पूर्व आणि मॉन्सूनचा जोरदार पाऊस, हा मे महिन्यातच बरसला. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात सात महिन्यानंतरही म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला सुरूच आहे.
भीमा खोऱ्यातील २७ पैकी १६ धरणांमध्ये पाणीसाठा हा शंभर टक्के झाला आहे. तर नऊ धरणांमध्ये नव्वद टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. केवळ खडकवासला आणि माणिकडोह या दोनच धरणांमध्ये अनुक्रमे ६४.७५ आणि ८४.५९ टक्के सर्वात कमी पाणीसाठा अडवला आहे. सध्या येडगाव, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी आणि नाझरे धरणांच्या सांडव्यातून विसर्ग सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु