
छत्रपती संभाजीनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।आज छत्रपती संभाजीनगर येथे, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि माजी आमदार कैलास पाटील यांच्याप्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष सौ. रंजना (भाभी) प्रकाश जैस्वाल, माजी उपाध्यक्ष रावसाहेब तोगे, राजू जैस्वाल, पृथ्वीराज तोगे, अक्षय जैस्वाल यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी खालेद नाहदी, बाळासाहेब पवार, लक्ष्मण राजपूत, सुरेश पाटील, रमेश पाखरे, भाऊसाहेब मुंडवाडकर आणि भीमसिंग राजपूत यांनी उपस्थित राहून सर्वांचे मनापासून स्वागत केले.
या सर्व मान्यवरांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis