अतिक्रमण निर्मुलनामुळे सातपूरच्या भाजी मार्केट रस्त्याने घेतला मोकळा श्वास,
नाशिक, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। - गावातील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होताच भाजी मार्केट परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणाविरोधात मनपाने धडक कारवाई केली. या मोहिमेमुळे अनेक दिवसांपासून अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या रस्त्याने प
सातपूरच्या भाजी मार्केट रस्त्याने घेतला मोकळा श्वास सातपूर मनपातर्फे अतिक्रमण निर्मुलन मोहीम


नाशिक, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।

- गावातील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होताच भाजी मार्केट परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणाविरोधात मनपाने धडक कारवाई केली. या मोहिमेमुळे अनेक दिवसांपासून अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या रस्त्याने पुन्हा मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे संजय कोठुळे, तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी यांच्या पथकाने

मोहीम राबवली.

सातपूर भाजी मार्केट परिसरात नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अनेक गाळेधारक व विक्रेत्यांनी आपल्या दुकानांसमोर शेड, टेबल, कच्चा माल तसेच फळ-भाजीविक्रीचे गाड्या उभ्या करून अतिक्रमण केले होते. अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडी, अपघात होत असल्याने नागरिकांकडून सतत तक्रारी येत होत्या व मंदिर जीर्णोद्वाराच्या कामास सुरुवात झाल्याने वाढलेली वाहतूक लक्षात घेता अतिक्रमण हटविणे अत्यावश्यक झाले होते. मोहीम राबविण्यापूर्वी नोटीस देण्यात आली होती. या कारवाईने परिसर अतिक्रमण मुक्त झाल्याचे दिसते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande