
सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी मतदार नोंदणी सुरू झाली आहे. तुम्ही पदवीधर असाल तर या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी लिंक चा उपयोग करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा या निवडणूक कार्यक्रमाच्या प्रसिद्धी नोडल अधिकारी स्मिता पाटील यांनी केले आहे. शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी इच्छुकांना https://mahaelection.gov.inया वेबसाईट किंवा लिंकवर अपलोड करण्यासाठी कागदपत्रांचे फोटो काढावेत /स्कॅन करावेत असे पाटील यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड