सोलापुरात अत्याधुनिक अहिल्याभवन
सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरात महिला बालकल्यण भवन उभारणीस मान्यात मिळाली आहे. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मान्यता दिली आहे. या भवनामध्ये महिला आणि बालकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या भवनाचे नाव
सोलापुरात अत्याधुनिक अहिल्याभवन


सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरात महिला बालकल्यण भवन उभारणीस मान्यात मिळाली आहे. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मान्यता दिली आहे. या भवनामध्ये महिला आणि बालकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या भवनाचे नाव अहिल्याभवन ठेवण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत.मंत्रालयात सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या महिला व बालविकास भवनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या भवनास गती देण्यासाठी माजी दीपक आबा साळुंखे-पाटील व सुभाष चव्हाण यांनी पाठपुरावा केला आहे. महिला व बालकांना मिळणाऱ्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हे भवन उभारण्यात येत आहे. यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून, कामाची गती वाढवण्यासाठी मी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande