रत्नागिरीत विवाहितेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी, 3 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेचा पहाटेच्या सुमारास अचानक मृत्यू झाला. शमिम सादिक पठाण (वय २५) असे तिचे नाव असून, ती दोन लहान मुलांची आई होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑ
रत्नागिरीत विवाहितेचा आकस्मिक मृत्यू


रत्नागिरी, 3 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेचा पहाटेच्या सुमारास अचानक मृत्यू झाला. शमिम सादिक पठाण (वय २५) असे तिचे नाव असून, ती दोन लहान मुलांची आई होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पठाण कुटुंब झोपलेले असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास शमिम यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ही बाब लक्षात येताच पती सादिक पठाण यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने शमिम यांना खासगी वाहनातून परकार हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र सकाळी चारच्या सुमारास शमिम यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande