टाटा सिएरा २५ नोव्हेंबरला होणार लाँच
मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सनं जाहीर केलं आहे की कंपनी २५ नोव्हेंबर रोजी आपल्या आयकॉनिक एसयूव्ही ‘सिएरा’ची नवी आवृत्ती भारतीय बाजारात लाँच करणार आहे. एकेकाळी लोकप्रिय ठरलेली ही एसयूव्ही पुन्हा एकदा आधुनिक रूपात रस्त्या
Tata Sierra


मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सनं जाहीर केलं आहे की कंपनी २५ नोव्हेंबर रोजी आपल्या आयकॉनिक एसयूव्ही ‘सिएरा’ची नवी आवृत्ती भारतीय बाजारात लाँच करणार आहे. एकेकाळी लोकप्रिय ठरलेली ही एसयूव्ही पुन्हा एकदा आधुनिक रूपात रस्त्यावर येणार आहे. लाँचपूर्वी १५ नोव्हेंबरला सिएराचं अधिकृत अनावरण करण्यात येणार असून, या मॉडेलचं उत्सुकतेनं वाट पाहिली जात आहे.

नव्या टाटा सिएराचं डिझाइन आणि तंत्रज्ञान पूर्णपणे आधुनिक स्वरूपात तयार करण्यात आलं आहे. यामध्ये ऑल-एलईडी लायटिंग सेटअप, समोरील आणि मागील बाजूस फुल-विड्थ लाइटबार, ब्लॅकआउट ओआरव्हीएम, सी-पिलर्स, फ्लश-फिटिंग डोर हँडल्स आणि शार्क फिन अँटेना असे फीचर्स दिले जातील. आतल्या भागात थ्री-स्क्रीन लेआउटचा आकर्षक वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि फ्रंट पॅसेंजरसाठी स्वतंत्र स्क्रीनचा समावेश असेल. अंदाजे १२.३ इंचांच्या या स्क्रीन्स फ्लोटिंग डिझाइनमध्ये बसवण्यात येतील. ड्युअल-टोन फिनिश, सॉफ्ट-टच सरफेस आणि अ‍ॅम्बियंट लायटिंगमुळे केबिन अधिक प्रीमियम वाटेल.

इंजिनच्या बाबतीत टाटा सिएराला तीन पर्याय असतील — टाटा हॅरियरप्रमाणे २.० लिटर डिझेल इंजिन, तसेच १.५ लिटर नॅचरली ॲस्पायरेटेड पेट्रोल आणि १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय. याशिवाय कंपनीने या मॉडेलची इलेक्ट्रिक आवृत्ती सुद्धा आणण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही आकर्षक निवड ठरेल.

भारतीय एसयूव्ही बाजारपेठेत सध्या मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर आणि ह्युंदाई क्रेटा यांसारख्या गाड्यांची मजबूत उपस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर टाटा सिएरा आपल्या दमदार डिझाइन, प्रगत फीचर्स आणि विविध इंजिन पर्यायांमुळे या स्पर्धेत महत्त्वाचा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्सने सिएराला एक क्लासिक नाव आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नव्या पिढीतील ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. १५ नोव्हेंबरच्या अनावरणात तिच्या फिचर्स आणि व्हेरिएंट्सबाबत अधिक तपशील जाहीर होणार असून, २५ नोव्हेंबरच्या लाँचनंतर किंमत आणि बुकिंगची माहिती उपलब्ध होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande