वंचित बहुजन आघाडीच्या सुजात आंबेडकरांनी घेतला निवडणूक पूर्व आढावा
नांदेड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।तळेगाव, उमरी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पूर्वतया
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर


नांदेड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।तळेगाव, उमरी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रभर युवा नेते सुजात आंबेडकर यांचा दौरा सुरू आहे. आगामी निवणूक प्रचार यंत्रणेचा प्रभावीपणे वापर, पक्षाची ध्येय धोरण आणि ठाम भूमिका जनतेला समजून सांगणे, बूथ बांधणी अश्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता कैलास वाघमारे, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगळे, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande