
नांदेड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।वंदे मातरम गीताच्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक गानाचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेतवंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. देशभक्ती आणि राष्ट्रीय भावना जागृत करणाऱ्या या गीताचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सामूहिक गानाचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी दिल्या आहेत.
या निमित्ताने 7 नोव्हेंबर रोजी सकाळी निश्चित वेळेत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरमचे सामूहिक गान करण्यात यावे. तसेच या कार्यक्रमात अधिकारी-कर्मचारी यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक असून, अधिनस्त कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांनाही सहभागाचे निर्देश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis