
बीड, 3 नोव्हेंबर (हिं.स.) भारत–पाक युद्धात 1971 मध्ये हौतात्म्य पत्करणारे जवान अर्जुन शंकरराव काकडे पाटील यांच्या स्मरणार्थ आज जरूड चौकाचे नामकरण त्यांच्या नावाने करण्यात आले. बीड जिल्ह्यातील जरूड चौकात हा कार्यक्रम संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के याप्रसंगी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के म्हणाले की,या प्रसंगी शहीद जवानास अभिवादन करताना मनात अभिमान आणि कृतज्ञतेची भावना जागृत झाली. देशासाठी बलिदान दिलेल्या या वीरपुत्राच्या हौतात्म्याला मानाचा मुजरा. या स्मरणीय उपक्रमासाठी आणि शहीदाच्या सन्मानासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व जरूड ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास महंत दादाजी यांच्यासह गावातील नागरिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis