
रत्नागिरी, 3 नोव्हेंबर, (हिं. स.) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभाग आणि निर्वाचन गणांची अंतिम आरक्षण अधिसूचना आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद, सर्व तहसीलदार कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या https://ratnagiri.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
असे प्रभारी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये ही माहिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या 1 ऑक्टोबर 2025 च्या आदेशानुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी