आम्ही एक जबाबदार अणु संपन्न देश आहोत - चीन परराष्ट्र मंत्रालय
बीजिंग , 3 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच काही देश अण्वस्त्र चाचणी करत असल्याचा दावा केला. यात त्यांनी चीन आणि रशिया हे देश जमिनीखाली गुप्त पद्धतीने अण्वस्त्र चाचणी घेत असल्याचे ट्रम्प म्हणाले.यावर आता थेट
आम्ही एक जबाबदार अणु संपन्न देश आहोत- चीन परराष्ट्रमंत्रालय


बीजिंग , 3 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच काही देश अण्वस्त्र चाचणी करत असल्याचा दावा केला. यात त्यांनी चीन आणि रशिया हे देश जमिनीखाली गुप्त पद्धतीने अण्वस्त्र चाचणी घेत असल्याचे ट्रम्प म्हणाले.यावर आता थेट चीनची प्रतिकिया समोर आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा खोडून काढला आहे. इतकंच नाही तर, हा दावा फेटाळून लावताना आम्ही एक जबाबदार अणु संपन्न देश आहोत, असे चीनने म्हटले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या दाव्यांना उत्तर देताना स्पष्ट केले की, चीन एक जबाबदार अण्वस्त्रसज्ज राष्ट्र आहे. बीजिंगने नेहमीच स्व-संरक्षणात्मक अण्वस्त्र धोरण कायम ठेवले आहे आणि अण्वस्त्र चाचणी थांबवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे कठोरपणे पालन केले आहे.

अमेरिकन चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत, ज्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका हा एकमेव देश आहे जो सध्या अणुचाचणी करत नाही. आम्ही एकमेव देश आहोत, जो चाचणी करत नाही आणि मला चाचणी न करणारा एकमेव देश बनायचे नाही, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी अणुचाचण्या करणाऱ्या देशांमध्ये उत्तर कोरिया आणि पाकिस्तानचे देखील नाव घेतले.

या मुलाखती दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अण्वस्त्र क्षमतेबद्दलही मोठा दावा केला. त्यांनी म्हटले की, अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि त्यांच्याकडे जगाला १५० वेळा उडवून देण्याइतकी अण्वस्त्रे आहेत.

आपल्याकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि मला वाटते की आपण अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाबद्दल काहीतरी केले पाहिजे. मी राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोघांशीही यावर चर्चा केली आहे, असे ट्रम्प यांनी नमूद केले. ट्रम्प यांच्या या दाव्यांमुळे जागतिक राजकारणात अणुचाचण्यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनने मात्र 'जबाबदार राष्ट्र' म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande