जलजीवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा - संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।जलजिवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय झालेल्या कामांची पाहणी करावी,असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खा. संदिपान भुमरे यांनी आज दिले. जिल्हा विकास समन्वय
जलजिवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा-खा.भुमरे


छत्रपती संभाजीनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।जलजिवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय झालेल्या कामांची पाहणी करावी,असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खा. संदिपान भुमरे यांनी आज दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदिपान पाटील भुमरे हे होते. तसेच राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे, समितीचे सह अध्यक्ष राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड व लोकसभा सदस्य डॉ. कल्याण काळे तसेच विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, आ. अनुराधा चव्हाण,आ. विलास भुमरे, राज्य समितीचे सदस्य अजिनाथ धामणे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते.

प्रारंभी दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर सदस्यांनी चर्चा केली. त्यात केंद्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), स्वच्छ भारत मिशन शहरी, जलजीवन मिशन, एकीकृत बालविकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामाची, घरकुल योजनेत होत असलेल्या कामांची, जलजीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी करण्यात यावी असे निर्देश खा. संदिपान भुमरे यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande