नाशिक : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदा तिरावर भाविकांची गर्दी
नाशिक, 5 नोव्हेंबर (हिं.स.) : त्रिपुरी पौर्णिमा निमित्ताने दक्षिणेची काशी असलेल्या गोदावरी नदीचा किनारी आज, बुधवारी रामकुंडा वरती वाती जळून परंपरागत पद्धतीने पौर्णिमा साजरी करण्यात आली तर काळाराम मंदिरामध्ये दिवे लावून पौर्णिमा साजरी झाली. यानिमि
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदा घाटावर भाविकांची गर्दी


नाशिक, 5 नोव्हेंबर (हिं.स.) : त्रिपुरी पौर्णिमा निमित्ताने दक्षिणेची काशी असलेल्या गोदावरी नदीचा किनारी आज, बुधवारी रामकुंडा वरती वाती जळून परंपरागत पद्धतीने पौर्णिमा साजरी करण्यात आली तर काळाराम मंदिरामध्ये दिवे लावून पौर्णिमा साजरी झाली. यानिमित्ताने गोदावरी किनारी मोठी गर्दी देखील झाली होती

त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शिवाच्या विजयाला समर्पित आहे. या दिवशी, भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. यामुळे, या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी भाविकांची धारणा असल्याने गोदावरीत पवित्र स्नान करून तुपाच्या वाती जाळण्यासाठी व गोदावरीत दिवे सोडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व असते. कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना मागावी. तसेच देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जुन दिवा लावला जातो. कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य दिल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत होते अशी मानले जाते यामुळे गोदावरीत स्नान करून अर्घ्य देण्यासाठीभाविकांची गर्दी झाली होती. मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनच्या वतीने गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.काळाराम मंदिरात कार्तिक शुद्ध पौर्णिमा पणती पौर्णिमा देव दिवाळी निमित्याने श्री काळाराम मंदिर नाशिक दिपउत्सव 1100 दिवे मंदिर प्रांगणात लावून साजरी करण्यात आली . यावेळी नाशिक शहरातील नागरिक तसेच अनेक राम भक्त यावेळी उपस्थित होते अशी माहिती

विश्वस्त तथा वंशपरंपरागत पुजारी धनंजय पुजारी यांनी दिली

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande