अलिबागसह दहा नगरपरिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
रायगड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अलिबागसह दहा नगरपरिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या निवडणुका डिसेंबर २०२५ मध्ये होणार असून, प्रशासकीय स्तरावर त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील बह
Election schedule announced for ten municipal councils including Alibaug – Nomination filing from November 10


रायगड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अलिबागसह दहा नगरपरिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या निवडणुका डिसेंबर २०२५ मध्ये होणार असून, प्रशासकीय स्तरावर त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील बहुतेक नगरपरिषदांचा कार्यकाळ २०२१ मध्ये संपला होता. तेव्हापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट लागू आहे. चार वर्षांपासून नगरपरिषदेचा कारभार मुख्याधिकारी प्रशासक या नात्याने सांभाळत आहेत. निवडणुका लांबणीवर गेल्याने स्थानिक पातळीवरील जनतेचा सहभाग थांबला होता. यामुळे नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक जाहीर होण्याची उत्सुकता निर्माण झाली होती.

राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची घोषणा केली होती. त्यानुसार अलिबाग नगरपरिषदेवर खुला महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर सदस्यपदांच्या आरक्षणाची घोषणा दि. ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. या आरक्षणात महिला आणि पुरुष उमेदवारांना समान संधी देण्यात आली आहे.

अखेर आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा, महाड, श्रीवर्धन, पेण, उरण, माथेरान, खोपोली आणि कर्जत या नगरपरिषदांच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. या दहा नगरपरिषदांच्या सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर छाननी, अर्ज माघारी आणि मतदानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचार मोहीम सुरू करण्याची तयारी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande