निफाड - शेतकऱ्याची कर्जबाजारपणातून आत्महत्या; तालुका हादरला
निफाड, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) : सततच्या कर्जबाजारीपणा आणि पावसाने दिलेल्या फटक्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुसरी घटना तालुक्यामध्ये घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना शासनाच्या विरोधात निर्माण झाले असून याप्रकरणी
शेतकऱ्याची कर्जबाजारपणातून आत्महत्या, तालुका हादरला


निफाड, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) : सततच्या कर्जबाजारीपणा आणि पावसाने दिलेल्या फटक्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुसरी घटना तालुक्यामध्ये घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना शासनाच्या विरोधात निर्माण झाले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे

दोन दिवसांपूर्वी मरळगाई येथील शेतकरी, तर सोमवारी उगावच्या शेतक-याची आत्महत्येची जखम ताजी असतानाच तालुक्यातील पाचोरे वणी येथील रंगनाथ नामदेव वाटपाडे (वय ७५) या ज्येष्ठ शेतकऱ्याने कर्जबाजारीतून द्राक्षबागेचे विषारी औषध सेवन करत राहत्या घरालगतच आत्महत्या केली.

पाचोरे वणी येथील शेतकरी रंगनाथ वाटपाडे यांनी शेतात टोमॅटो पिकाची लागवड केली होती. पोषके, महागडी औषधे, कीटकनाशकाची फवारणी करून व दर्जेदार टोमॅटो पीक घेऊनही लागवड केलेल्या टोमॅटो पिकाला समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी लागवड केलेले लाल कांदेदेखील नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने पूर्णतः खराब झाले. उन्हाळ कांद्याच्यालागवडीसाठी शेतात टाकलेले कांदारोपही पावसातुन वाचले नाही, तर द्राक्षबागेची छाटणी करून काही दिवस झाले असताना द्राक्षवेलींवर द्राक्षमालच दिसत नसल्याने वाटपाडे हतबल झाले होते. त्यामुळे वाढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विंवेचनेत होते, वाढलेल्या कर्जाबाबत घरातील सदस्यांसोबत संवाद साधला असता शेतातून उत्पन्न घरात येणार नसल्याने घरातील सदस्यदेखील चिंतेत असल्याचे वाटपाडे यांच्या लक्षात आल्याने मी माझ्या कुंटुबासाठी काहीच करू शकत नाही, त्यातच राज्य शासनाच्या कर्जमाफीबद्दल असलेल्या उदासीन धोरणाला कंटाळून नैराश्यापोटी वाटपाडे यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande