
कोल्हापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञातांनी त्यांच्या ताफ्यासमोर उसाच्या कांड्या फेकल्या. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. ही घटना कोल्हापूर विमानतळ ते कोल्हापूर शहर मार्गावर पुणे बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी येथे घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढारीकार डॉ प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी कोल्हापूर दौर्यावर आले होते. विमानतळावरून त्यांचा ताफा कोल्हापूर शहरात जात असताना उजळाईवाडी येथे पुणे बेंगलोर महामार्गवरच अचानक अज्ञातानी उसाच्या कांड्या भरलेली पोती रस्त्यावर पडलेली होती. त्यामुळे ताफा थांबला. पोलिस आणि शासकिय यंत्रणेची तारांबळ उडाली. ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर
संताप व्यक्त करण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली.घटनास्थळी कडक बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे काही काळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन उसाच्या कांड्या बाजूला केले.आंदोलकांनी महामार्गावर उसाच्या कांड्या भरलेली पोती टाकून निषेध नोंदवला. एकरकमी एफआरपी आणि साखर कारखानदारांची आडमुठी भूमिका यावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप उसळल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar