नाशिक - मनपा अभियंता भरती रद्दची खासदार वाजेंची मागणी
नाशिक, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) - नाशिक महानगरपालिकेच्या स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विभागातील सहाय्यक अभियंता भरती प्रक्रियेत कायम ठेवलेल्या संशयास्पद अटीं” वरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र ल
नाशिक - मनपा अभियंता भरती रद्दची खासदार वाजेंची मागणी


नाशिक, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) - नाशिक महानगरपालिकेच्या स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विभागातील सहाय्यक अभियंता भरती प्रक्रियेत कायम ठेवलेल्या संशयास्पद अटीं” वरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून ही अट अन्यायकारक व जटिल असल्याचे नमूद करत भरती तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली

वाजे यांनी यापूर्वीही याच अटीबाबत आक्षेप नोंदवला होता. मात्र, अंतिम जाहिरातीत ती अट पुन्हा ठेवण्यात आल्याने त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “ही बाब गंभीर असून यात भरती मॅनेजमेंटचे षड्यंत्र असल्याचा संशय आहे,” असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

खासदारांनी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांनाही या पत्राची प्रत पाठवली असून, इतर महापालिकांमध्ये अशी अट नसताना फक्त नाशिकमध्येच ती लागू का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.वाजे म्हणाले, “टेंडर मॅनेजमेंट ऐकलं होतं, पण आता भरती मॅनेजमेंट सुरू झालं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. भरती पारदर्शक नसेल तर आम्हाला इतर मार्ग अवलंबावे लागतील.”या प्रकरणामुळे मनपा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भरती प्रक्रियेबाबतची चर्चा पुन्हा एकदा शहरात गाजू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande