दानवेंचा आरोप महाजनांचा इन्कार पण माजी नगरसेवक गुलदस्त्यातच
नाशिक, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक मधील एका विद्यमान आमदाराला मारण्यासाठी म्हणून भाजपच्या एका माजी नगरसेवकाने सुपारी दिल्याचा आरोप हा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून नक्की
दानवेंचा आरोप महाजनांचा इन्कार पण माजी नगरसेवक गुलदस्त्यातच


नाशिक, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक मधील एका विद्यमान आमदाराला मारण्यासाठी म्हणून भाजपच्या एका माजी नगरसेवकाने सुपारी दिल्याचा आरोप हा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून नक्की माजी नगरसेवक आणि विद्यमान आमदार कोण यावरून उलट सुलट चर्चा सुरू झालेले आहेत दरम्यान या सर्व प्रकरणावर ती खाजगी मध्ये निवडक पत्रकारांशी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व प्रकरणाची आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगून हे सर्व दिशाभूल करण्याचे कट कटस्थान असल्याचा आरोप केला आहे.

मागील काही दिवसापासून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी क्लीन नासिक , गुन्हेगार मुक्त नाशिक अशी मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेचा परिणाम म्हणून काही प्रमाणामध्ये नाशिक मधील गुन्हेगारी ही कमी झाली पण हे सर्व घडत असताना सर्वसाधारण महिनाभरापासून नाशिकच्या राजकारणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहरातील एका मतदारसंघांमध्ये उभ्या असलेल्या आणि निवडून आलेल्या आमदाराला मारण्यासाठी म्हणून भाजपच्या एका माजी नगरसेवकाने सुपारी दिल्याची चर्चा जोरात सुरू आहे यामध्ये या माजी नगरसेवकाला पोलीस ठाण्यामध्ये बोलावल्याचे देखील नाशिकच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते सांगत आहेत पण त्याला मात्र पोलिसांनी सरळ मार्गाने पुष्टी दिलेली नाही. हे सर्व घडत असताना आता हा नगरसेवक भाजपाचे संकट मोचक असलेले आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समर्थक आहे असं सांगितलं जातं कारण ज्या माजी नगरसेवकाचे नाव या ठिकाणी येत आहे तो काही काळ गिरीश महाजन यांचे वाहन चालविण्याचे काम देखील नाशिकमध्ये करत होता त्यांच्यावर दस्ताने बरच काही या माजी नगरसेवकाकडे आहे. पण याला कुठे खात्री होत नव्हती त्यामुळे हा विषय बंद झाला होता

मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या विषयाला पुन्हा एकदा उघडपणे तोंड फोडले आणि याबाबत खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील माहिती आहे याबाबतची माहिती नाशिक पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे दानवे सांगत आहेत त्यामुळे खरे किती खोटे किती यावर आता जरी प्रश्न असला तरी नाशिकच्या राजकारणामध्ये घडत असलेल्या या चर्चेला पुन्हा तोंड फुटले पण तो विद्यमान आमदार कोण तो माजी नगरसेवक कोण या प्रश्नांची उत्तर मात्र आत्ता तरी गुलदस्त्यात आहे. या सर्व प्रश्नांवरती नेहमीच्या पद्धतीने संकटमोचक गिरीश महाजन यांच्याशी नाशिकच्या निवडक पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी ज्याच्याशी भाजपाचा काही संबंध नाही असे काही झालेच नाही असे सांगून विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करताना दानवे यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे आता येणाऱ्या काळात हा विषय किती सत्य बाहेर आणतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande