मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतून नव उद्योजकांना आर्थिक बळ - आ. राम भदाणे
धुळे, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) एकविसाव्या शेतकातील युवकांजवळ मोठे टॅलेंट आहे. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे नङ्ग लागता, स्वतच्या बुध्दीमत्तेचा वापर करून स्वत उद्योग उभारुन नावलौकिक मिळवायला हवा. त्यातून इतरांनाही नोकर्या उपलब्ध होतील. उद्योग उभारण्यासा
मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतून नव उद्योजकांना आर्थिक बळ - आ. राम भदाणे


धुळे, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) एकविसाव्या शेतकातील युवकांजवळ मोठे टॅलेंट आहे. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे नङ्ग लागता, स्वतच्या बुध्दीमत्तेचा वापर करून स्वत उद्योग उभारुन नावलौकिक मिळवायला हवा. त्यातून इतरांनाही नोकर्या उपलब्ध होतील. उद्योग उभारण्यासाठी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पन्नास लाखाची मदत मिळते. या योजनेतून युवकांना उद्योग व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन आमदार राम भदाणे यांनी केले. धुळे शहराजवळील नगाव बारीजवळ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सर्व प्रकारच्या धनधान्याचे क्लिनींग, ग्रेडींग, प्रोसेसिंग व आटा तयार करण्याच्या उद्योगाचा मुहूर्तमेढ आमदार राम भदाणे यांच्या हस्ते झाला.

यावेळी आमदार भदाणे शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करीत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खादी व ग्रामोद्योगचे राज्य निर्देशक योगेश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक मनोज चव्हाण, कृषी केंद्राचे वानखडे, श्रीकोमल, भानुदास भदाणे, अरूण भदाणे, यज्ञेश्वर भदाणे, सीमा भदाणे, यश भदाणे, राहुल पाटील, अमोल भदाणे, मुकूल भदाणे, राज भदाणे, एन. सी. भदाणे, एम. पी. भदाणे, दीपक खैरनार, शरद पवार आदी उपस्थित होते.

आ. राम भदाणे पुढे म्हणालेत, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. जी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, उत्पादन, सेवा आणि कृषी-आधारित उद्योगांसाठी अनुदानित कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सुक्ष्म आणि लघु उद्योगांची स्थापना करून रोजगाराच्या संधी निर्माण करून देत आहे. उत्पादन, सेवा आणि कृषी-आधारित व प्राथमिक कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळत आहे. युवकांजवळ विविध प्रकारचे कौशल्य असते. त्या कौशल्याचा वापर ते केवळ नोकरीसाठी करीत असतात. मात्र ते कौशल्य व्यवसायासाठी वापरले वापरले पाहिजे. युवकांनी उद्योग व्यवसायातून स्वतची प्रगती केली पाहिजे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. काही अडचणी उभ्या राहतात. त्या अडचणी सोडविण्यासाठी मी तुमच्या पाठिशी असल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande