
कोल्हापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।
सर्वच थरातून मिळणारे प्रेम हेच प्रतापसिंह जाधव यांच्या कर्तृत्वाचे फलीत आहे. दैदिप्यमान परंपरेचा वारसा हाती आला तो त्यांनी व्रतस्तपणे ५० वर्षाहून अधिक काळ चालवली. कोल्हापूरचे सर्व महत्वाच्या प्रश्नात रोखठोक भूमिका घेतली. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते पुढारीकार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रसोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुढारीकार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा दैदिप्यमान सहस्त्रचंद्रसोहळा येथील पोलिस परेड ग्राउंडवर पार पडला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की
पुढारी आणि बाळासाहेब यानी कोल्हापूर च्या सर्वच प्रश्नावर निष्पक्ष भुमिका घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व प्रश्न महायुती सरकारने मार्गी लावले आहेत.एक माहिण्यापूर्वीच खंडपीठाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवला आहे.
अध्यक्ष म्हणून बोलताना शरद पवार म्हणाले की पुढारीकार प्रतापसिंह जाधव यांच्या सत्कार सोहळ्याला लोक गंगेचा महापूर आला आहे कारण. कोल्हापूरसह सीमा भागातील अनेक प्रश्न, सोडवण्यासाठी झालेल्या चळवळीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या सिहांयन आत्मचरित्रात महाराष्ट्राचा बदलत्या विकासाचे आणि विचाराचे प्रतिबिंब आहे.
गौरव समीती अध्यक्ष खा. शाहू महाराज यांनी स्वागतपर भाषणात कोल्हापूर शहरातील रस्ते हायकोर्ट प्रस्ताव रेल्वे दुहेरी मार्ग आणि सहयाद्री एक्स्प्रेस वैभववाडी
एअरपोर्ट, विकास. राजाराम महाराज नाव, शेतकरी कर्जमाफी, तुर्त अनुदान द्यावे खासदार आणि छत्रपती म्हणून माझ्याकडे आलेले विकास कामाचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित पक्षाविरहीत दृष्टीकोन ठेवून निधी द्यावा असे सांगीतले.
प्रास्ताविकात योगेश जाधव- समाजाला नवी देण्याचा वस्तुपाठ डॉ.पद्मश्री प्रतापसिह जाधव यानी पत्रकारीतेतून घालून दिला. त्याचा सनकारात्मक परिणाम घडून आले. ५५ वर्षे आखंडीत पत्रकारीता आणि पुढारीला वाहून घेतले. व्हिजन डेडीकेशन डेअरींग या तीन गोष्टी शिकलो.
केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यशैलीत डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे कौतुक करून मला मोठे करण्यात पुढारीया वाटा. मराठा आरक्षणा सर्व समाजाला न्याय देण्यासाठी मी पवार साहेब, कॉंग्रेस, आता महायुतीत म्हणून मंत्रीपदावर असल्याचे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग. गो. जाधव यानी पुढारी हा जनतेचा आवाज बनवला प्रतापसिंह जाधव, योगेश जाधव यानी दैनिक, टीव्ही चॅनेल एफ एम रेडिओ वस्तुनिष्ठ आणि सामाजिक हित जपण्याची वृत्ती यामुळे पुढारी एक संस्था बनली. जनमाणसात पुढारीचे अढळ स्थान पुढारीचे निर्माण केले आहे. त्यांचे सामाजिक योगदान कोणीही नाकारू शकत नाही. खा शाहू महाराजांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन त्यांनी महायुतीने २५० कोटीचे कन्वेक्शन सेंटर, जोतिबा विकास आदी कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. शासकीय मेडिकल, इंजिनियरींग कॉलेज, हायकोर्ट इमारत, जे कोल्हापूरसाठी करावे लागते ते करण्यास महायुती सरकार तसूभर कमी पडणार नाही. हद्दवाढीला विरोध नको. असे सांगीतले
यावेळी सत्कार, सिंहयन आत्मचरित्राचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ प्रतापसिंह जाधव - यांनी सत्कराला उत्तर देताना आपले प्रेम मर्मबंधाची ठेव, कृतार्थ जीवन, मातीत रग आणि धग प्रेरणा करवीर नगरी करवीरकर महात्म्य स्वाभिमान आणि निभिडतेची तलवारीची धार लेखणीला दिली. गुळ मिरची कुस्ती तांबडा पांढरा पायताण,मिसळ याचा उपयोग कोठे आणि कसे करायचे हे चांगलेय ठाऊक आहे. माता पित्यांमुळे नि घडलो. पुढारीचा .. 'तुम्ही नेते, मी पुढारी'आहे अशा भावना व्यक्त करून सिंहायन आत्मचरित्रात राज्याच्या देशाचा राजकारणाचा लेखा-जोखा असल्याचे सांगीतले.आणि जनतेच्या प्रत्येक लढ्यात रस्त्यावर उतरून लढण्याची पत्रकारिता केली. मी सडेतोड. तरीही सर्वांशी मैत्री. पुढारी श्वास पत्रकारीता ध्यास
सहज काही मिळत नाही कष्टाने मिळवावे लागते. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानात विस्फोट, पत्रकारितेत अमुलाग्र बदल तरीही पत्रकारीतेचा आत्मा असलेली विश्वासार्हता बदलत नाही. असे मत व्यक्त केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, ना. उदय सामंत, ना. . पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री तसेच कोल्हापूर जिल्हयासह पश्चिम महाराष्ट्र बेळगाव सीमा भागातील मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar