परभणीच्या राजीव गांधी कृषी महाविद्यालयास कबड्डीत विजेतेपद
परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी येथील राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्या मुलींनी आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कबड्डीत विजेतेपद, तर व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धांचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाड
परभणीच्या राजीव गांधी कृषी महाविद्यालयास कबड्डीत विजेतेपद


परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी येथील राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्या मुलींनी आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कबड्डीत विजेतेपद, तर व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धांचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आले होते.

कबड्डी स्पर्धेत एकूण 14 संघांनी सहभाग नोंदविला होता. राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने दमदार खेळ सादर करत सुवर्णपदक मिळविले. संघात कर्णधार कोमल पंगनवाड, धनश्री देशमुख, रोहीणी भोरपे, श्रद्धा कोल्हे, श्रद्धा बोरकर, निकीता राठोड, निकीता आव्हाड आणि शिवकन्या पवार यांचा समावेश होता. व्हॉलीबॉल स्पर्धेतही महाविद्यालयाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद मिळविले. या संघात कर्णधार कु. श्‍वेता पाटील, कोमल पंगनवाड, एश्‍वर्या मरकोले, सिद्धी देवकते, संध्या शिंदे, धनश्री देशमुख, निकीता राठोड, रोहीणी भोरपे आणि दुर्गा सरकटे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मीताई देशमुख, सचिव रवीराज देशमुख आणि प्राचार्य डॉ. डी. बी. पवार यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या यशामागे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अभिजीत कंडेरे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande