निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुका काँग्रेसची गुरुवारी सभा
रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : संगमेश्वर तालुका राष्ट्रीय काँग्रेसची सभा गुरुवारी, दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवरूख येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुका काँग्रेसची गुरुवारी सभा


रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : संगमेश्वर तालुका राष्ट्रीय काँग्रेसची सभा गुरुवारी, दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवरूख येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती या सभेत ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष काशिनाथ वाजे यांनी केले आहे.

देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी पक्षाकडून उमेदवारी मागणीचे विहित नमुना अर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष वाजे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande