रत्नागिरी : खल्वायनच्या मासिक संगीत सभेत सावनी पारेकर यांचे गायन
रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची ३१९वी मासिक संगीत सभा शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) होणार असून त्यामध्ये मुंबईची गानहिरा पारितोषिक विजेती युवा गायिका सावनी पारेकर हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग-नाट्यगीतांचे सादरीकरण
खल्वायनची मासिक सभा


रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची ३१९वी मासिक संगीत सभा शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) होणार असून त्यामध्ये मुंबईची गानहिरा पारितोषिक विजेती युवा गायिका सावनी पारेकर हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग-नाट्यगीतांचे सादरीकरण होणार आहे.

सावनी पारेकर गेली १० वर्षे शास्त्रीय गायनाचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक आणि व्हायोलिन वादक प्रसिद्ध गायिका अपूर्वा गोखले आणि पल्लवी गोखले यांच्याकडून घेत आहे. २०२१ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद परीक्षा प्रथम श्रेणीत ती उत्तीर्ण झाली असून मुंबईतील एसएनडीटी कॉलेजमधून तिने बीए (म्युझिक) ही पदवी रौप्यपदकासह प्राप्त केली. याचवर्षी तिने एमए (म्युझिक) ही पदवी गानहिरा पारितोषिकासह प्राप्त केली आहे. रत्नागिरीतील मैफलीला तबलासाथ रत्नागिरीतील प्रसिद्ध वादक प्रथमेश शहाणे व हार्मोनिअमसाथ चिपळूण येथील प्रसिद्ध वादक अमित ओक करणार आहेत.

शनिवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात ही संगीत सभा आयोजित केली आहे. या कै. संजय मुळ्ये आणि कै. मंदाकिनी कान्हेरे स्मृती संगीत सभेचा सर्व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande