
रायगड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। मध्य रेल्वेने जाहीर केले आहे की नेरळ–माथेरान दरम्यानची लोकप्रिय मिनी ट्रेन सेवा गुरुवारी ६ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्याच्या काळात (जून ते ऑक्टोबर) ही सेवा बंद ठेवण्यात येते. मात्र या कालावधीत अमन लॉज–माथेरान दरम्यान शटल सेवा नियमितपणे सुरू होती.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, नेरळ–माथेरान दरम्यान दोन नियमित गाड्या धावतील. ट्रेन क्रमांक 52103 सकाळी ८.५० वाजता नेरळ येथून सुटून ११.३० वाजता माथेरान येथे पोहोचेल, तर ट्रेन क्रमांक 52105 सकाळी १०.२५ वाजता सुटून १.०५ वाजता माथेरान येथे पोहोचेल. परतीच्या गाड्यांमध्ये ट्रेन क्रमांक 52104 दुपारी २.४५ वाजता आणि ट्रेन क्रमांक 52106 संध्याकाळी ४ वाजता माथेरानहून सुटतील. या गाड्यांमध्ये व्हिस्टाडोम कोच, प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणीचे डबे तसेच सामान वाहक व्हॅन असतील. प्रवाशांना डोंगररांगेतून जाणाऱ्या या सुंदर रेल्वे प्रवासाचा आनंद पुन्हा अनुभवता येणार आहे.
(नेरळ – माथेरान – नेरळ ट्रेन सेवा:–
नेरळ–माथेरान डाउन गाड्या
१. ट्रेन क्रमांक 52103 नेरळ येथून ०८.५० वाजता सुटेल आणि माथेरान येथे ११.३० वाजता पोहोचेल (दैनिक)
२. ट्रेन क्रमांक 52105 नेरळ येथून १०.२५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १३.०५ वाजता पोहोचेल (दैनिक)
माथेरान – नेरळ अप गाड्या
१. गाडी क्रमांक 52104 माथेरान येथून १४.४५ वाजता सुटेल आणि नेरळ येथे १७.३० वाजता पोहोचेल (दैनिक)
२. गाडी क्रमांक 52106 माथेरान येथून १६.०० वाजता सुटेल आणि नेरळ येथे १८.४० वाजता पोहोचेल (दैनिक)
गाडी क्रमांक 52103/52104 या गाड्या एकूण ६ कोचेससह चालतील तीन द्वितीय , १ व्हिस्टाडोम कोच आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान वाहक व्हॅन.
गाडी क्रमांक 52105/52106 या गाड्या एकूण ६ कोचेससह चालतील तीन द्वितीय, एक प्रथम कोच आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान वाहक व्हॅन.
(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा
अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दैनिक)
१. गाडी क्रमांक 52153 अमन लॉज येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे ०९.०३ वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 52155 अमन लॉज येथून ०९.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे ०९.५३ वाजता पोहोचेल.
३. गाडी क्रमांक 52157 अमन लॉज येथून १२.०० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १२.१८ वाजता पोहोचेल.
४. गाडी क्रमांक 52159 अमन लॉज येथून १४.२५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १४.४३ वाजता पोहोचेल.
५. गाडी क्रमांक 52161 अमन लॉज येथून १५.४० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १५.५८ वाजता पोहोचेल.
६. गाडी क्रमांक 52163 अमन लॉज येथून १७.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १८.०३ वाजता पोहोचेल.
शनिवार / रविवार विशेष सेवा खालीलप्रमाणे:
७. विशेष-१ अमन लॉज येथून १०.३० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १०.४८ वाजता पोहोचेल.
८. विशेष-३ अमन लॉज येथून १३.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १३.५३ वाजता पोहोचेल.
माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दैनिक)
१. गाडी क्रमांक 52154 माथेरान येथून ०८.२० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ०८.३८ वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 52156 माथेरान येथून ०९.१० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ०९.२८ वाजता पोहोचेल.
३. गाडी क्रमांक 52158 माथेरान येथून ११.३५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ११.५३ वाजता पोहोचेल.
४. गाडी क्रमांक 52160 माथेरान येथून १४.०० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १४.१८ वाजता पोहोचेल.
५. गाडी क्रमांक 52162 माथेरान येथून १५.१५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १५.३३ वाजता पोहोचेल.
६. गाडी क्रमांक 52164 माथेरान येथून १७.२० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १७.३८ वाजता पोहोचेल.
शनिवार / रविवार विशेष सेवा खालीलप्रमाणे:
७. विशेष-२ माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहोचेल.
८. विशेष-४ माथेरान येथून १३.१० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १३.२८ वाजता पोहोचेल.
याशिवाय अमन लॉज–माथेरान दरम्यानच्या शटल सेवा दररोज अनेक फेऱ्यांमध्ये धावतील. शनिवार व रविवारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दोन विशेष गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुमारे १५ ते २० मिनिटांच्या अंतराने या गाड्या उपलब्ध असतील.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली असून, प्रवाशांना या वेळापत्रकाची नोंद घेऊन नियोजनपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके