महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2026 खेळणार, सध्या निवृत्तीचा विचार नाही - सीएसके सीईओ
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.)चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चे सीईओ कासी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२६ मध्ये खेळेल. त्यांनी सांगितले की धोनीचा सध्या निवृत्तीचा कोणताही विचार नाही. एका मुलाखतीत आपला नातू नोआशी बोलत
महेंद्रसिंग धोनी


नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.)चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चे सीईओ कासी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२६ मध्ये खेळेल. त्यांनी सांगितले की धोनीचा सध्या निवृत्तीचा कोणताही विचार नाही. एका मुलाखतीत आपला नातू नोआशी बोलताना विश्वनाथन म्हणाले, धोनी या आयपीएलममध्ये निवृत्त होणार नाही. मी त्याच्याशी याबद्दल बोलेन.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले. पण आयपीएल २०२५ च्या हंगामात सीएसकेची कामगिरी खराब होती. संघाने १४ पैकी फक्त चार सामने जिंकले आणि पहिल्यांदाच पॉइंट टेबलमध्ये तळाशी राहिला.

एका कार्यक्रमात धोनीने आपल्या भविष्याबद्दल बोलताना म्हटले होते की, मला याबद्दल विचार करण्यासाठी ४-५ महिने आहेत. मी असे म्हणत नाही की, मी संपलो आहे, आणि मी पुनरागमन करणार नाही. माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. म्हणून, निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे चांगले. दरवर्षी, तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला १५% जास्त मेहनत करावी लागते, कारण हे उच्च दर्जाचे व्यावसायिक क्रिकेट आहे.

धोनी ४४ वर्षांचा आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होता. ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर त्याला हंगामाच्या मध्यभागी चेन्नईचे नेतृत्व करावे लागले. त्याने चारपैकी तीन सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. फलंदाज म्हणून त्याने १३ डावांमध्ये १९६ धावा केल्या. ३० धावा ही त्याची गेल्या हंगमातील सर्वोच्च धावसंख्या होती.

धोनी हा आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. त्याने सर्वाधिक 235 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १५८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. धोनीने शेवटचे चेन्नई सुपरकिंग्जला २०२३ मध्ये विजेतेपद मिळवून दिले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने १३६ सामने जिंकले आहेत, तर ९७ सामने गमावले आहेत.

सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत २७८ सामने खेळले आहेत. त्याने चेन्नई सुपरकिंग्जला पाच वि

जेतेपद मिळवून दिले आहेत. त्याने ३८.३० च्या सरासरीने ५४३९ धावा केल्या आहेत. या काळात धोनीने २४ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने विकेटकीपिंगमध्ये ४७ स्टंपिंग आणि १५४ झेल घेतले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande