
अहमदाबाद, 6 नोव्हेंबर (हिं.स.) - कृत्रिम अमली पदार्थांच्या उत्पादनावर मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातमधील वलसाड येथे गुजरात राज्य महामार्ग 701 जवळ असलेल्या परिसरात कार्यरत एक गुप्त कारखाना उद्ध्वस्त केला आहे. नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ असलेल्या अल्प्राझोलाम या अंमली पदार्थाचे उत्पादन या कारखान्यात होत होते. ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन या सांकेतिक नावाने केलेल्या या कारवाईत 22 कोटी रुपयांचे अल्प्राझोलम जप्त करण्यात आले आणि चार जणांना अटक करण्यात आली, यामध्ये प्रमुख म्होरक्या वित्तपुरवठादार, उत्पादक आणि एकाचा समावेश आहे.
- प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या कारखान्यावर नजर ठेवली. 4 नोव्हेंबर रोजी कारखान्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये कारखान्यात सुरु असलेल्या अवैध उत्पादन प्रक्रियेचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत 9.55 किलोग्रॅम अल्प्राझोलाम (तयार स्वरूपात), 104.15 किलोग्रॅम अल्प्राझोलाम (अर्धवट तयार स्वरूपात), 431 किलोग्रॅम कच्चा माल ज्यामध्ये प्रमुख रसायनांचा समावेश आहे. तयार केलेले अल्प्राझोलामचा पुरवठा तेलंगणामध्ये पुरवठा केला जाणार होता, आणि ते ताडीमध्ये मिसळण्यासाठी वापरले जाणार होते, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी