गोदरेज एंटरप्रायझेसच्या सिक्युरिटी सोल्यूशन्स व्यवसायाची २०% झेप
मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतामध्ये सुरक्षा उपायांची गरज आणि जागरूकता झपाट्याने वाढत असताना, गॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्यूशन्स व्यवसायाची वाढही वेग घेत आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व्यवसाया
गोदरेज


मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतामध्ये सुरक्षा उपायांची गरज आणि जागरूकता झपाट्याने वाढत असताना, गॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्यूशन्स व्यवसायाची वाढही वेग घेत आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व्यवसायाला दुहेरी अंकातील (double-digit) वाढ मिळत आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांचे वाढलेले खर्च आणि होम सेफ्टी सोल्यूशन्ससाठी डिजिटल तसेच ऑफलाइन चॅनेल्सवरील वाढती मागणी यामुळे ही गती आणखी वेगवान झाली आहे. ही उदयोन्मुख शहरे आता एकूण महसुलातील सुमारे 30% योगदान देत आहेत, ज्यामुळे महानगरांच्या पलीकडे ग्राहक मागणीत मोठा बदल झाल्याचे दिसून येते. सध्या व्यवसाय 20% वार्षिक वाढीच्या दराने प्रगती करत आहे आणि देशभरातील 4,500 पेक्षा अधिक टचपॉइंट्स, मजबूत डिजिटल उपस्थिती तसेच प्रमाणित सेफ्स, लॉकर आणि कनेक्टेड सर्व्हिलन्स सोल्यूशन्स यांचा आधार घेऊन आधुनिक होत असलेल्या भारतीय घरांच्या गरजांची पूर्तता करत आहे.

या वाढीमागे मॅक्रो इकॉनॉमिक बदलांचे मोठे योगदान आहे — ज्यामध्ये शहरीकरणाची वाढ, 2024 मध्ये घरगुती वित्तीय मालमत्तेत 14.5% वाढ, तसेच सणासुदीतील ऑनलाइन खरेदीमध्ये 30% वाढ आणि ई-कॉमर्स शिपमेंट्स ₹1.2 लाख कोटींचा आकडा पार करण्याची अपेक्षा समाविष्ट आहे. नव्या घरमालकांना आधुनिक इंटिरियरशी जुळणारे लॉकर हवे आहेत, ज्वेलर्स BIS प्रमाणित सेफ्स प्राधान्याने निवडत आहेत आणि संस्थांमध्ये मॉड्युलर स्ट्राँग रूम सोल्यूशन्स स्वीकारले जात आहेत. या मागणी लक्षात घेऊन गॉदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स स्मार्ट, नियमपालन करणारी (compliant) आणि डिझाईन-फॉरवर्ड उत्पादने उपलब्ध करून देत आहे जी बदलत्या जीवनशैलीशी सुसंगत आहेत. BIS आणि ISI प्रमाणन हे ब्रँडच्या तत्त्वज्ञानाचे केंद्र म्हणून कायम ठेवण्यात आले आहे, जे ग्राहकांचा विश्वास आणि नियामक अनुपालन सुनिश्चित करते.

गॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्यूशन्स व्यवसायाचे बिझनेस हेड पुष्कर गोखले म्हणाले : “टियर 2 शहरे आता मागे नाहीत — ती आघाडी घेत आहेत. नवीन घर खरेदीदार, ज्वेलर्स किंवा संस्थात्मक ग्राहक — सर्वजण सुरक्षित, नियमपालन करणारे आणि आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत सोल्यूशन्सची मागणी करत आहेत. आमची वाढ नवोन्मेषामुळे आहे, पण पाया आहे तो विश्वास, पोहोच आणि सुसंगततेचा. सुरक्षित जीवनशैली सक्षम करण्याचा आम्हाला अभिमान आहे — आमची परंपरा आणि भविष्य या दोन्हींचे प्रतिबिंब आमच्या सोल्यूशन्समध्ये दिसते. 2025 मध्ये आमचे लक्ष विशेषतः इंडोर, गुवाहाटी, कोची यांसारख्या टियर 2 शहरांवर राहिले, जिथे प्रेस मिट्स आणि इन्फ्लुएन्सर अ‍ॅक्टिव्हेशन्सद्वारे आम्ही घर आणि संस्थात्मक सुरक्षा याबद्दल जागरूकता निर्माण केली.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande