परभणीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ; आता जनावरेही टार्गेट
परभणी, 6 नोव्हेंबर (हिं.स.)परभणी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता चोरट्यांनी जनावरांनाही लक्ष केले आहे. शहरात फिरणारी किंवा गोठ्यात बांधलेली जनावरे उचलून नेण्याचे प्रकार समोर येत आहेत.
परभणीत चोरीच्या घटनांना ऊत; आता जनावरेही टार्गेट

परभणी, 6 नोव्हेंबर (हिं.स.)परभणी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता चोरट्यांनी जनावरांनाही लक्ष केले आहे. शहरात फिरणारी किंवा गोठ्यात बांधलेली जनावरे उचलून नेण्याचे प्रकार समोर येत आहेत.

असाच एक प्रकार वांगी रोड परिसरात घडला आहे. भैय्यासाहेब आंबेडकर नगर, वांगी रोड येथील रहिवासी शेख रियाज फारूक खाटीक कुरेशी यांच्या गोठ्यात बांधलेली गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शहरात आधीच घरफोडी आणि चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता जनावर चोरीच्या प्रकारांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील सुरक्षिततेसंदर्भात नागरिकांनी पोलिस प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावीत, अशी मागणी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande