विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर (हिं.स.) २०२५ च्या विश्वचषक विजयानंतर, भारतीय संघाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ही भेट नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झाली, जिथे राष्ट्रपतींनी टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत
भारतीय महिला क्रिकेट संघााने घेतली  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट


नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर (हिं.स.) २०२५ च्या विश्वचषक विजयानंतर, भारतीय संघाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ही भेट नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झाली, जिथे राष्ट्रपतींनी टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना क्रिकेटपटूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली. कर्णधार हरमनप्रीतने विश्वचषक ट्रॉफी हातात घेऊन राष्ट्रपतींसोबत फोटोही काढला. संपूर्ण संघाने राष्ट्रपतींसोबत फोटो सेशनमध्येही भाग घेतला.

बुधवारी भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी संघाला त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले आणि क्रिकेटपटूंशी संवाद साधला होता. भेटीदरम्यान उपकर्णधार स्मृती मानधनाने २०१७ च्या त्यांच्या भेटीची आठवण करून दिली आणि म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या शब्दांनी त्यांना प्रेरणा दिली होती आणि ते संघासाठी प्रेरणास्रोत आहेत.

रविवारी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्स गमावून २९८ धावा केल्या. संघाकडून शफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या, तर दीप्ती शर्मानेही अर्धशकत झळकावून आणि 5 विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. भारतीय संघाने या विजयासह पहिल्यांदा विश्वचषकाच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande