
मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने (एमएलएमएमएल) आजपर्यंत 3 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत भारतातील आघाडीची व्यावसायिक ईव्ही उत्पादक म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एमएलएमएमएल ही भारतातील पहिली ओईएम आहे ज्याने हा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या या कामगिरीमुळे व्यावसायिक ईव्ही क्षेत्रात पर्यावरणपूरक वाहतूक आणि नावीन्यपूर्णतेमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित झाले आहेत. तसेच कंपनी भारतातील सर्वात विस्तृत इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ ऑफर करते, ज्यामध्ये ट्रिओ श्रेणी, झोर ग्रँड, ई-अल्फा 3-व्हीलर्स आणि महिंद्रा झिओ फोर-व्हीलर यांचा समावेश आहे. या ईव्हींनी एकत्रितपणे 5 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे. यामुळे 185 किलो मेट्रिक टन पेक्षा जास्त CO₂ उत्सर्जनाची भरपाई केली आहे. दुसऱ्या शब्दात हे उत्सर्जन 4.3 दशलक्ष झाडे लावण्याच्या पर्यावरणीय फायद्याएवढे असल्याचा अंदाज आहे.
प्रामुख्याने ईव्हीवर लक्ष केंद्रित करून शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रवास सुरळीत राहील यासाठी एमएलएमएमएल सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी परिसंस्था विकसित करण्यासाठी अनेक भागीदारांसोबत एकत्रितपणे काम करत आहे.
कंपनीच्या प्रगतीने चांगलाच वेग पकडला आहे. गेल्या अवघ्या 12 महिन्यांत 1 लाख ईव्ही विकल्या गेल्या आहेत, ज्यामुळे महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील ग्राहकांचा विश्वास आणि त्यांना मिळत असलेली पसंती अधोरेखित होते. नवोपक्रमांना प्राधान्य आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे, एमएलएमएमएलने गेल्या दोन वर्षांत नवीन तसेच अपग्रेडेड उत्पादने लाँच केली आहेत. यामध्ये ट्रिओ प्लस शीट मेटल, ई-अल्फा प्लस, झोर ग्रँड रेंज प्लस आणि महिंद्रा झिओ यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी 2 लाख ईव्हींचा टप्पा गाठल्यानंतर, एमएलएमएमएलने त्यांचा ग्राहक-केंद्रित उदय एनएक्सटी उपक्रम सादर केला जो ड्रायव्हरच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे दर्शवतो. ज्यामध्ये 20 लाख रुपयांचे अपघाती विमा कव्हर आणि आर्थिक समुपदेशन असे फायदे मिळतात. 3 लाख ईव्हीच्या टप्प्यासाठी, एमएलएमएमएलने iOS, Android आणि वेबवर नवीनतम NEMO प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. ड्रायव्हर्स आणि फ्लीट मॅनेजर्सना त्यांच्या वाहनांचे दूरस्थपणे व्यवस्थापन आणि निरीक्षण करण्यास NEMO प्लॅटफॉर्म सक्षम करतो. प्रमुख नवीन वैशिष्ट्यांमध्ये एकाच ऍपमध्ये मल्टी-व्हेइकल व्यवस्थापन, जिओ-ट्रॅकिंग, सर्व्हिस बुकिंग, रोडसाईड असिस्टन्स (RSA), विस्तृत चार्जिंग नेटवर्क लोकेशन्स आणि अन्य बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. हे उपक्रम गतिशीलता वाढवण्याचे आणि वाहनाच्या पलीकडे अतुलनीय संधी देण्याचे महिंद्राचे सर्वसमावेशक ध्येय अधोरेखित करतात.
महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुमन मिश्रा म्हणाल्या, “पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने सुरू असलेल्या आमच्या प्रवासात 3 लाख ईव्हीचा टप्पा गाठणे हा एक अभिमानास्पद क्षण आहे. ग्राहकांनी आमच्या ईव्हीवर ठेवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीमध्ये आम्ही केवळ ईव्हीचे उत्पादन करत नाही तर आम्ही रोजगार निर्मिती करतो आणि स्वच्छ
भविष्याचा पाया रचतो आहोत. अशा नावीन्यपूर्ण उत्पादनांद्वारे आम्ही इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यावहारिक आणि प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता मजबूत करत आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर