मलोलन रंगराजन आरसीबी महिला संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक
बंगळुरु, ६ नोव्हेंबर, (हिं.स.): रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आगामी महिला प्रीमियर लीग हंगामासाठी मलोलन रंगराजन यांची संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ते २०२४ पासून या पदावर असलेल्या ल्यूक विल्यम्स यांची जागा घेणार आहेत. आगामी हंगाम
मलोलन रंगराजन


बंगळुरु, ६ नोव्हेंबर, (हिं.स.): रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आगामी महिला प्रीमियर लीग हंगामासाठी मलोलन रंगराजन यांची संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ते २०२४ पासून या पदावर असलेल्या ल्यूक विल्यम्स यांची जागा घेणार आहेत.

आगामी हंगाम जानेवारीच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या काळात ल्यूक विल्यम्स बिग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्यस्त असणार आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

तामिळनाडूचे माजी क्रिकेटपटू मलोलन रंगराजन गेल्या सहा वर्षांपासून आरसीबी फ्रँचायझीशी विविध भूमिकांमध्ये जोडले गेले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी आरसीबी महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

त्यांच्या नियुक्तीबद्दल बोलताना कर्णधार स्मृती मानधना म्हणाली, माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि क्रिकेटवर आमच्यात अनेक चर्चा झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांचा संघावर सकारात्मक प्रभाव राहिला आहे. मला विश्वास आहे की, येत्या हंगामात आम्ही एकत्रितपणे आरसीबीला यशाकडे नेऊ.

आरसीबीच्या महिला संघाने डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावले होते. पण 2025 च्या हंगमात हा संघ चौथ्या स्थानावर राहिला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande