
परभणी, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। तक्रारदाराकडून एक हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे याच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आरोपी लोकसेवकाला एसीबी पथकाने न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार यांच्या पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र काढल्यानंतर मानवत तालुक्यातील खरबा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांनी एक हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात सापळा कारवाई पडताळणी झाल्यानंतर गुन्हा नोंद झाला. त्यानुसार आरोपी लोकसेवकास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis