लाईटिंग व्यवसायाच्या विस्तारासह पॉलीकॅब इंडियाची एफएमईजी धोरणाला बळकटी
मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। वायर्स आणि केबल्समधील आघाडीची उत्पादक कंपनी तसेच फास्ट-मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (एफएमईजी) विभागातील वेगाने वाढणारी पॉलीकॅब इंडिया लिमिटेड त्यांच्या लाइटिंग आणि ल्युमिनरीज व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ करते आहे. यामुळे
मुंबई


मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। वायर्स आणि केबल्समधील आघाडीची उत्पादक कंपनी तसेच फास्ट-मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (एफएमईजी) विभागातील वेगाने वाढणारी पॉलीकॅब इंडिया लिमिटेड त्यांच्या लाइटिंग आणि ल्युमिनरीज व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ करते आहे. यामुळे धोरणात्मक वाढीला आणखी पाठबळ मिळणार आहे.

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता निवासी, व्यावसायिक तसेच मोकळ्या जागेतील लाइटिंग पोर्टफोलिओचा विस्तार करण्याचे पॉलीकॅबने ठरवले आहे. यामुळे भारतीय घरांमध्ये तसेच कामाच्या ठिकाणी उत्तम लायटिंगसाठी पॉलीकॅब लायटिंगलाच प्राधान्य दिले जाते. तसेच कंपनीच्या वचनबद्धतेला बळकटी मिळते.

आर्थिक वर्ष 25मध्ये, पॉलीकॅबने 200हून अधिक नवीन एसकेयू लाँच करून या विस्ताराला गती दिली. यासोबतच जवळजवळ 700 शहरांपर्यंत वितरण वाढवले. एवढेच नाही तर, 170+ वितरक आणि 11,500+ किरकोळ विक्रेत्यांसह चॅनेलसोबत भागीदारी मजबूत केली. यामुळेच त्यांच्या ऊर्जा-कार्यक्षम, उत्तम दर्जाच्या प्रकाशयोजना शहरी तसेच निम शहरी बाजारपेठांमध्ये लोकप्रिय आहेत.

चांगला, स्वच्छ प्रकाश हा मूड आणि सकारात्मकतेशी नाते जोडणारा असतो, असे जवळजवळ 70% भारतीय ग्राहकांचे म्हणणे आहे. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन पॉलीकॅब आपल्या लाईटिंग व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहात नाही. त्यांच्यासाठी ती केवळ दिव्यांची रोषणाई नाही तर ग्राहकांशी जोडले गेलेले नाते आहे. भारतातील सणांचे महत्त्व लक्षात घेता त्यांनी ‘ए ब्राइट, ब्युटीफुल कनेक्शन’ अशी मोहीमच सुरू केली आहे. याद्वारे संपूर्ण कंपनी दिव्यांच्या माध्यमातून आनंद साजरा करत असतानाच आपले सांस्कृतिक भान तर राखतेच पण सामाजिक पत देखील सांभाळते. यासोबतच पर्यावरणपूरक जीवनशैलीची देखील काळजी घेते. या क्षेत्रातील पॉलीकॅबचे ठामपणे पाय रोवून उभे राहणे हे FMEG पोर्टफोलिओमध्ये धोरणात्मक वाढीसाठी पॉलीकॅब योग्य स्थितीत असल्याचे दर्शवते.

वाढत्या विस्तारावर भाष्य करताना पॉलीकॅब इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य व्यवसाय अधिकारी (B2C) श्री. ईशविंदर खुराणा म्हणाले: “प्रकाशयोजना म्हणजे केवळ प्रकाशाबद्दल नाही - तर त्याचे नाते आता एखाद्या जवळच्या अनुभवाशी जोडलेले आहे. एखाद्याला चांगला अनुभव देणे आणि स्वतःचे मत ठामपणे मांडणे हा देखील त्याचाच एक भाग आहे. लोकांसाठी त्यांच्या खास आठवणी तयार करणारे, लोकांना त्यांच्या क्षणात रमू देणारे शक्तिशाली माध्यम म्हणून आम्ही प्रकाशाकडे पाहतो. आमचा विस्तारित पोर्टफोलिओ तसेच भौगोलिक विस्तार हा नवोन्मेष, गुणवत्ता आणि ग्राहकांप्रतीची आमची वचनबद्धता दर्शवितो. आमच्या FMEG प्रवासात वाढीचा एक प्रमुख घटक म्हणून याचा उपयोग करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

पॉलीकॅबने अलीकडेच ग्लिस या ब्रँड नावाखाली सीलिंग लाइट्सची मालिका सादर केली आहे, ही एक प्रीमियम सीओबी लाइटिंग रचना आहे ज्यात उत्तम लुमेन कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि आकर्षक सौंदर्यशास्त्राचे अनोखे एकत्रिकरण आहे. यामुळेच घरे तसेच व्यावसायिक जागांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. याला पूरक म्हणून, कंपनीने त्यांची आउटडोअर एलईडी श्रेणी देखील सादर केली, ज्यामध्ये हवामानरोधक गेट लाइट्स, रोप लाइट्स, स्ट्रीट लाइट्स, फ्लड लाइट्स आणि अन्य बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे - जे भारतातील मोकळ्या जागांना एक अनोखी स्टाईल, लूक तर देतेच पण टिकाऊपणासोबत ऊर्जा कार्यक्षमता देखील देते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande