
नवी दिल्ली , 6 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान आफ्रिकेतील बोत्सवाना देशाचा दौरा करणार आहेत. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (ईआर) सुधाकर दळेला यांनी दिली आहे.
सुधाकर दळेला यांनी सांगितले की, राष्ट्रपती मुर्मू या बोत्सवाना देशाच्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरून 11 ते 13 नोव्हेंबरदरम्यान आफ्रिकेतील बोत्सवाना देशाचा दौरा करतील.त्यांनी पुढे सांगितले की परदेश दौर्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू या बोत्सवानाच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेदरम्यान दोन्ही राष्ट्रप्रमुख देशातील तसेच गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, शेती, आरोग्य, औषधनिर्मिती, संरक्षण आणि इतर क्षेत्रांशी संबंधित विषयांवर विचारविनिमय करतील.
दोन्ही देशांच्या जनतेमधील संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी नव्या संधींवरही चर्चा होईल. परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की बोत्सवानामध्ये राष्ट्रपती मुर्मू या त्या देशाच्या संसदेला देखील संबोधित करतील.
याशिवाय सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याचाही कार्यक्रम आखण्यात आला आहे. या दौर्यादरम्यान भारतीय व्यापारी समुदाय बोत्सवानासोबत संबंधित क्षेत्रांमध्ये भागीदारी कशी अधिक मजबूत करू शकतो, यावर चर्चा करण्याचीही संधी मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode