आरसीबी विक्रीसाठी सज्ज: २०२६ च्या आयपीएलपूर्वी विक्री प्रक्रिया पूर्ण होणार
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीग हंगामापूर्वी विकली जाऊ शकते. डियाजिओ पीएलसीची भारतीय युनिट युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला याबाबत एक पत्र लिहिले आहे. कंपनी
आरसीबी


नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीग हंगामापूर्वी विकली जाऊ शकते. डियाजिओ पीएलसीची भारतीय युनिट युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला याबाबत एक पत्र लिहिले आहे.

कंपनीने पत्रात म्हटले आहे की, ते त्यांच्या उपकंपनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमधील गुंतवणुकीचा आढावा सुरू करत आहे. ही प्रक्रिया आरसीबी पुरुष आणि महिला दोन्ही संघांना व्यापेल आणि कंपनीला ३१ मार्च २०२६ पर्यंत हा आढावा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

एक महिन्यापूर्वी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट अंदाजे १७,००० कोटी रुपयांना आरसीबी विकत घेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यावेळी, अदार पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले होते, आरसीबी योग्य मूल्यांकनात एक उत्तम संघ आहे.

आरसीबी पूर्वी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीचा संघ होता. पण २०१६ मध्ये जेव्हा मल्ल्या अडचणीत सापडला तेव्हा डियाजिओने त्यांच्या मद्य कंपनीसह आरसीबीचा संघ विकत घेतला.

विजय मल्ल्या यांनी २००८ मध्ये आरसीबीला १११.६ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले होते. त्यावेळी ही रक्कम अंदाजे ४७६ कोटी रुपये होती. त्यावेळी ती आयपीएलमधील दुसरी सर्वात महागडी टीम होती. मल्ल्या यांची कंपनी, यूएसएल आरसीबीच्या मालकीची होती.

२०१४ मध्ये डियाजिओने यूएसएलमध्ये बहुसंख्य हिस्सा विकत घेतला आणि २०१६ मध्ये मल्ल्या बाहेर पडल्यानंतर, डियाजिओने आरसीबीची पूर्ण मालकी घेतली. सध्या, आरसीबी यूएसएलची उपकंपनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवली जाते.

यूएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रवीण सोमेश्वर यांनी सांगितले की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नेहमीच कंपनीसाठी एक महत्त्वाचा ब्रँड राहिला आहे. पण ते त्यांच्या मुख्य व्यवसायाचा मद्य आणि पेय व्यवसायाचा भाग नाही.त्यांनी सांगितले की, या हालचालीवरून असे दिसून येते की, यूएसएल आणि डियाजियो कंपनीची कामगिरी सुधारेल आणि पुढेही मजबूत राहील याची खात्री करण्यासाठी वेळोवेळी त्यांच्या भारतातील कामकाजाचा आढावा घेत राहतात.कंपनीने असेही म्हटले आहे की आरसीबी संघ आणि त्यांच्या सहयोगींचे हित पूर्णपणे संरक्षित केले जाईल याची खात्री करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande