आरआर काबेलने सादर केली फ्युचर रेडी वायर्सची मालिका
मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातील वायर आणि केबल्सचे अग्रगण्य उत्पादक आरआर काबेल कंपनीने वाढत्या तापमान आणि विद्युत ताण वाढत असणाऱ्या युगात भारतीय घरे आणि पायाभूत सुविधांच्या बदलत्या गरजांना लक्षात घेऊन अत्याधुनिक वायर सोल्युशन्सची मालिका जाहीर
भविष्यातील घरांना ऊर्जा देण्यासाठी आरआर काबेलने सादर केली फ्युचर रेडी वायर्सची मालिका


मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातील वायर आणि केबल्सचे अग्रगण्य उत्पादक आरआर काबेल कंपनीने वाढत्या तापमान आणि विद्युत ताण वाढत असणाऱ्या युगात भारतीय घरे आणि पायाभूत सुविधांच्या बदलत्या गरजांना लक्षात घेऊन अत्याधुनिक वायर सोल्युशन्सची मालिका जाहीर केली आहे. या नव्या उत्पादनांमध्ये Superex Green HR+FR आणि Firex LS0H-EBXL या दोन वायर्सचा समावेश आहे. विविध उपयोजनांमध्ये सर्वोच्च सुरक्षितता, कार्यक्षमता आणि टिकावूपणाच्या दृष्टीने त्यांचे डिझाइन केले आहे.

“घरं अधिक स्मार्ट होत आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे वायर्स मध्ये बदल, सुधारणा करणे आवश्यक ठरत आहे,” असे आरआर काबेलचे कार्यकारी संचालक श्री. राजेश काबरा यांनी सांगितलं. “आमची ही नवीन श्रेणी फक्त आजच्या गरजा भागविण्यासाठी नाही तर जास्त तापमान, मोठ्या प्रमाणावर विद्युत लोड, अधिक सुरक्षितता आणि पर्यावरणीय जबाबदारी या उद्याच्या आव्हानांचा विचार करून त्यासाठीही तयार आहे.”

Superex Green HR+FR वायर

प्रगत हिट गार्ड तंत्रज्ञान आणि कठोर REACH व RoHS मानकांचे पालन (245 हून अधिक हानिकारक रसायनांपासून मुक्त) एकत्रित करून तयार केलेली Superex Green ही भारतातील काही मोजक्या पर्यावरणपूरक वायरपैकी एक असून सुरक्षितता आणि टिकावूपणासाठी डिझाइन केलेली आहे. ही HR + FR वायर 85°अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकते. त्यामुळे उष्णता आणि विद्युत सुरक्षितता सुनिश्चित होते. Advanced Class 2 conductor सह डिझाइन केलेल्या या वायरमध्ये सुधारित यांत्रिक टिकाऊपणा आहे. तसेच ऊर्जेचा ऱ्हास कमी होतो. त्यामुळे ती उच्च प्रमाणात लोड घेणे आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी योग्य ठरते. उच्च वहनक्षमता मिळण्यासाठी 100% शुद्ध इलेक्ट्रोलायटिक कॉपरच्या वापराने तयार असून दीर्घकाळ टिकण्यासाठी anti-pest protection सुविधेसह येते. तिचं वैशिष्ट्यपूर्ण हरित पॅकेजिंग तिच्या पर्यावरणपूरक भूमिकेला अधोरेखित करते. Superex Green ही फक्त वायर नाही तर कार्यक्षमतेत तडजोड न करता शाश्वततेला प्राधान्य देणाऱ्या जागरूक आणि जबाबदार नागरिकांची निवड आहे.

Firex LS0H-EBXL वायर

सर्वात कठोर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेली Firex LS0H-EBXL वायर ही साधारण PVC वायरपेक्षा 2× जास्त विद्युत लोड वाहू शकते आणि तिच्या Electron Beam

Cross-Linking (EBXL) तंत्रज्ञानामुळे तसेच Low Smoke Zero Halogen (LS0H) इन्सुलेशनमुळे ती 900°C पर्यंत तापमानावर वितळत नाही.

आगीच्या घटनेत ही वायर बिनविषारी, पारदर्शक धूर सोडते. त्यामुळे सुरक्षित सुटकेसाठी मदत मिळते. तिच्या प्रगत फ्लेक्झीबल कंडक्टर डिझाईन मुळे बसवणे सोपे होते, तसेच 60 हून अधिक वर्षे टिकण्याची खात्री, अंगभूत anti-rodent आणि anti-termite protection यामुळे Firex अतुलनीय सुरक्षितता आणि टिकाऊपणा प्रदान करते. ही वायर कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि अग्निसुरक्षा अत्यावश्यक असलेल्या उच्च मजल्यांच्या इमारती, स्मार्ट होम्स, रुग्णालये, हॉटेल्स आणि सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार डिझाइन केली गेली आहे.

सर्व श्रेणीतील समान मूल्य प्रस्ताव:

• उच्च तापमान सहनशीलता आणि विद्युत लोड घेऊ शकेल अशा दृष्टीने तयार

• 100% शुद्ध इलेक्ट्रोलायटिक कॉपर पासून तयार

• IS, REACH, RoHS, CE, CPR मानकांनुसार प्रमाणित

• Anti-rodent आणि anti-termite सुरक्षा

या नव्या उत्पादनांच्या सादरीकरणाद्वारे आरआर काबेलने विद्युत उद्योगात सुरक्षितता, टिकावूपणा आणि कार्यक्षमतेची नवी व्याख्या करण्याची आपली बांधिलकी कायम ठेवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande