
जळगाव, 6 नोव्हेंबर (हिं.स.)जळगाव सुवर्णपेठेत आज गुरुवारी २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. अर्थात २२ कॅरेट सोने दर प्रति तोळा १,०९,७३५ रुपये आहे. २४ कॅरेट सोने दर प्रति तोळा १,१९,८०० रुपये आहे. तर चांदी प्रति किलो १,४९,००० रुपयांवर आली आहे. देशात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२१,९१० रुपये आहे, जो कालच्या तुलनेत ४३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,११,७५० रुपये आहे.
मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, केरळ, पुणे, विजयवाडा, नागपूर आणि भुवनेश्वर सारख्या शहरांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव १२,१९१ रुपये आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव १२,२०६ रुपये आहे. वडोदरा, अहमदाबाद, सुरत आणि पटना येथे आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १२,१९६ रुपये आहे. जयपूर, लखनऊ आणि चंदीगडमध्ये गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव १२,२०६ रुपये आहे. चेन्नई, कोइम्बतूर आणि मदुराईमध्येही १२,२७३ रुपये आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर