भारताची टी-20 मालिकेत २-१ ने आघाडी, ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव
कॅनबेरा, 6 नोव्हेंबर (हिं.स.) क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल येथे झालेल्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. चौथ्या
भारती क्रिकेट संघ


कॅनबेरा, 6 नोव्हेंबर (हिं.स.) क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल येथे झालेल्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने १६७ धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ १८.२ षटकांत ११९ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ३० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केलीय पण ठराविक अंतराने त्यांनी आपल्या विकेट्स गमावल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने तीन, अक्षर पटेल आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत २० षटकांत १६७ धावा करण्यात यशस्वी झाला. चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाच्या एकाही फलंदाजाला त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. त्यामुळे टीम इंडिया १५० धावांचा टप्पाही ओलांडणार नाही असं वाटतं होतं. पण शेवटी अक्षर पटेलने फटकेबाजी केल्यानंतर टीम इंडियाला 167 धावा करण्यात यश आलं.

भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. गिलने ३९ चेंडूत ४६ धावा केल्या. अभिषेकने २८, शिवम दुबेने २२, अक्षर पटेलने नाबाद २१ आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने २० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झांपा आणि नाथन एलिसने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या टी२० मध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघात कोणताही बदल झाला नाही, तर ऑस्ट्रेलियाने चार बदल करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande