फिलीपिन्समध्ये कालमेगी वादळामुळे २४१ जणांचा मृत्यू; आणीबाणी जाहीर
मनिला, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी गुरुवारी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. फिलिपिन्स येथे आलेल्या शक्तिशाली कल्मेगी चक्रीवादळाच्या तडाख्यात किमान 241 लोक मृत किंवा बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे हे
फिलीपिन्समध्ये कालमेगी वादळामुळे २४१ जणांचा मृत्यू; आणीबाणी जाहीर


मनिला, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी गुरुवारी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. फिलिपिन्स येथे आलेल्या शक्तिशाली कल्मेगी चक्रीवादळाच्या तडाख्यात किमान 241 लोक मृत किंवा बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे हे आतापर्यंतच्या वर्षातील देशातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती ठरले आहे.

राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीदरम्यान या आणीबाणीची घोषणा केली. या निर्णयामुळे सरकारला आपत्कालीन मदत निधीचे वितरण जलदगतीने करण्यास आणि अन्नधान्याची जमवाजमव (साठेबाजी) तसेच किंमतींतील वाढ रोखण्यास मदत होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या वादळामुळे आतापर्यंत 114 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यांपैकी बहुतांश लोक अचानक आलेल्या पुरात बुडून मृत्यूमुखी पडले. तर 127 लोक अजूनही बेपत्ता आहेत. यांपैकी बहुतेक मध्यवर्ती प्रांत सेबू मधील आहेत, जो या वादळाने सर्वाधिक प्रभावित झाला आहे. कल्मेगी चक्रीवादळामुळे सुमारे 20 लाख लोक प्रभावित झाले असून, 5.6 लाखांहून अधिक ग्रामीणांना आपली घरे सोडावी लागली. यांपैकी सुमारे 4.5 लाख लोकांना आपत्कालीन तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande