विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.)पहिल्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि सलग तीन पराभव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग असूनही त्यांच्या जोर
विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट


नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.)पहिल्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि सलग तीन पराभव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग असूनही त्यांच्या जोरदार पुनरागमनाचे कौतुक केले.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने २०१७ मध्ये पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या तिच्या भेटीची आठवण करून दिली, जेव्हा ती ट्रॉफीशिवाय भेटली होती. यावेळी, ती ट्रॉफी घेऊन त्यांच्याशी भेटली. ती म्हणाली, आम्हाला ट्रॉफी घेऊन पुन्हा पुन्हा भेटायचे आहे. उपकर्णधार स्मृती मानधना म्हणाली, पंतप्रधानांनी सर्वांना प्रेरणा दिली. ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत.

भारतीय संघासोबत बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास आणि प्रशिक्षक अमोल मजुमदार देखील उपस्थित होते. बांगलादेशविरुद्ध जखमी झालेली प्रतीका रावल व्हीलचेअरवर दिसली. २ नोव्हेंबर रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून भारतीय संघाने महिला विश्वचषक जिंकला होता. संघातील क्रिकेटपटूंनी पंतप्रधान मोदींना एक खास जर्सी भेट दिली, ज्यावर सर्व क्रिकेटपटूंनी स्वाक्षरी केली होती. त्यावर NAMO-1 लिहिलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande