वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त स्मरणोत्सवाचे पंतप्रधान करणार उद्घाटन
* देशभरात संपूर्ण वंदे मातरम गीताचे होणार गायन * स्मृती तिकीट आणि नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे वंदे मातरम या राष्ट
वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त स्मरणोत्सवाचे पंतप्रधान करणार उद्घाटन


* देशभरात संपूर्ण वंदे मातरम गीताचे होणार गायन

* स्मृती तिकीट आणि नाण्याचे प्रकाशन

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.) -

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

या निमित्ताने पंतप्रधान एका स्मरण तिकीटाचे आणि नाण्याचे देखील प्रकाशन करणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेच्या 150 वर्षांचा हा उत्सव आहे. 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या वर्षात देशभरात होणाऱ्या स्मरणोत्सवाची ही औपचारिक सुरवात असेल.

या सोहळ्यात सकाळी 9.50 च्या सुमाराला मुख्य कार्यक्रमाच्या सोबत “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण रचनेचे सार्वजनिक स्थानांवर समाजातील सर्व स्तरांमधील नागरिकांच्या सहभागाने सामूहिक गायन होणार आहे.

2025 या वर्षात वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. “वंदे मातरम्” या आपल्या राष्ट्रीय गीताची रचना बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी अक्षय नवमीच्या शुभ दिनी केली होती. वंदे मातरम् सर्वप्रथम त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून 'बंगदर्शन' या साहित्यिक नियतकालिकात प्रकाशित झाले. मातृभूमीला सामर्थ्य, समृद्धी आणि देवत्वाचे प्रतीक मानणारे हे गीत भारताच्या जागृत होत असलेल्या एकता आणि आत्मसन्मानाच्या भावनेला काव्यात्मक अभिव्यक्ती देत होते. हे गीत लवकरच राष्ट्रासाठी भक्तीचे अखंड प्रतीक बनले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande