कळवण - धनादेश न वटल्याने कर्जदारास कारावास
कळवण, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कळवण येथील सप्तश्रृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या सप्तशृंगीगड शाखेचे कर्जदार पुष्या संजय दीक्षित रा. सप्तशृंगीगड यांनी वेळेवर कर्जफेड न केल्याने कर्जापोटी त्यांनी रक्कम
कळवण - धनादेश न वटल्याने कर्जदारास कारावास


कळवण, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कळवण येथील सप्तश्रृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या सप्तशृंगीगड शाखेचे कर्जदार पुष्या संजय दीक्षित रा. सप्तशृंगीगड यांनी वेळेवर कर्जफेड न केल्याने कर्जापोटी त्यांनी रक्कम ६,६४,४२० रुपयाचा धनादेश दिलेला होता. हा दिलेला धनादेश न बटता परत आल्याने त्यांचेविरुद्ध कळवण न्यायालयात केस दाखल केलेली होती. या केसचा निकाल लागला असुन न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षाव १३,२८,८४० रुपयाची दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सप्तश्रृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था कळवण शाखा सप्तशृंगीगड येथुन पुष्पा संजय दिक्षित यांनी रक्कम ५,००,००० रुपये इतके कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज थकबाकीत गेल्याने कर्जफेडीसाठी त्यांनी नाशिक जिल्हा महिला सहकारी बैंक शाखा सप्तश्रृंगीगड या बँकेचा स्वतःच्या खात्याचा धनादेश दिलेला होता.

पतसंस्थेने वेळोवेळी थकीत कर्ज भरण्यासाठी वसुलीचा तगादा लावत नोटीस देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी कर्ज भरण्याबाबत असहकार्याची भूमिका घेऊन टाळाटाळ केली. त्यांनी धनादेश दिलेला होता तो देखील वठला नाही. म्हणून संस्थेने कलम १३८ अन्वये चेकधारकाला न्यायालयीन प्रक्रियद्वारे नोटीस व समन्स दिले होते. न्यायालयाचा निकाल सदर याचिकेची सुनावणी होवुन धनादेश धारक यांना फौजदारी प्रक्रिया संहित कलम पत्रकाचा कायदा कलम १३८ या शिक्षापात्र गुन्हयासाठी दोषी ठरवुन एक वर्ष कारावासाची शिक्षा भोगावी आणि रक्कम १३,२८,८४० रुपये इतक्या द्रव्यदंडाची रक्कम न्यायालयात जमा करावी व रक्कम बसुल होईपर्यंत ९% वार्षिक दराने साधे व्याज जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर रक्कम जमा न केल्यास आणखी ९ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी असा निकाल कळवण न्यायालयाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande