रायगडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
एकूण २६९ वाहनचालकांकडून २ लाख ४५ हजारांचा दंड वसूल रायगड, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२
स्ते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील एकूण २८ पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही मोहिम राबवली.  या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण २६९ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून एकूण ₹२,४५,५०० इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये विनापरवाना वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, वाहनांची अति वेगाने धाव, तसेच चारचाकी वाहनांमधील सीटबेल्टचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना विनंती केली आहे की, अपघात टाळण्यासाठी आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  वाहतूक पोलिसांकडून अशी नियमित मोहिम राबवण्यात येत असल्याने शहरातील रस्त्यांवरील शिस्त वाढण्यास आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


एकूण २६९ वाहनचालकांकडून २ लाख ४५ हजारांचा दंड वसूल रायगड, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील एकूण २८ पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही मोहिम राबवली.

या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण २६९ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून एकूण ₹२,४५,५०० इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये विनापरवाना वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, वाहनांची अति वेगाने धाव, तसेच चारचाकी वाहनांमधील सीटबेल्टचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना विनंती केली आहे की, अपघात टाळण्यासाठी आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक पोलिसांकडून अशी नियमित मोहिम राबवण्यात येत असल्याने शहरातील रस्त्यांवरील शिस्त वाढण्यास आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande