जडेजा आणि सॅमसनच्या बदलीसाठी चेन्नई आणि राजस्थानमधील संभाव्य कराराची चर्चा
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर (हिं.स.) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये एक मोठा करार होणार आहे. दोन्ही संघ रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसनची देवाणघेवाण करण्यास तयार आहेत. पण राजस्थान रॉयल्सने करारात आणखी एक क्रिकेटपटू मागितल्याने अडथळा निर्माण झ
संजू सॅमसन आणि रविंद्र जडेजा


नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर (हिं.स.) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये एक मोठा करार होणार आहे. दोन्ही संघ रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसनची देवाणघेवाण करण्यास तयार आहेत. पण राजस्थान रॉयल्सने करारात आणखी एक क्रिकेटपटू मागितल्याने अडथळा निर्माण झाला आहे.

राजस्थान रॉयल्सला संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजा आणि देवाल्ड ब्रेविस हवे आहेत. इथेच प्रकरण अडकत आहे. चेन्नई सॅमसनसाठी जडेजाची देवाणघेवाण करण्यास तयार आहेय पण ते ब्रेविसला सोडू इच्छित नाहीत. दरम्यान, राजस्थान संघ सॅमसनच्या बदल्यात जडेजा आणि ब्रेविस दोघांनाही घेण्यावर ठाम आहे, ज्यामुळे करार धोक्यात येत असल्याचे दिसून येते.

दोन्ही क्रिकेटपटूंना त्यांच्या संबंधित संघात विशेष दर्जा आहे. जडेजा हा सीएसकेच्या प्रमुख क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो २०१२ पासून या फ्रँचायझीसोबत आहे. सीएसकेवर बंदी घालण्यात आल्यानंतर तो कोची या संघाकडून खेळला होता. पण २०१८ मध्ये तो चेन्नई संघात परतला.

रविंद्र जडेजाने आतापर्यंत 2५४ आयपीएल सामने खेळले आहेत. त्याने १९८ डावांमध्ये २७.८६ च्या सरासरीने ३,२६० धावा केल्या आहेत. त्याने २२५ डावांमध्ये ३०.५२ च्या सरासरीने १७० विकेट्सही घेतल्या आहेत.

सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर, तो २०१८ पासून राजस्थान रॉयल्समध्ये आहे. गेल्या अनेक हंगामांपासून त्याने आरआरचे नेतृत्वही केले आहे. संजूने आयपीएलमध्ये १७६ सामने खेळले आहेत, १७२ डावांमध्ये ३०.७५ च्या सरासरीने ४७०४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या, दोन्ही क्रिकेटपटूंची किंमत प्रत्येकी १८ कोटी रुपये आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande