रणजी ट्रॉफी सामन्यात मेघालयच्या आकाश कुमारचे 8 चेंडूत 8 षटकार
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर (हिं.स.) रणजी ट्रॉफी दरम्यान भारतीय क्रिकेट इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. तो म्हणजे ८ चेंडूत सलग ८ षटकार मारणे. मेघालयचा फलंदाज आकाश कुमार चौधरीने ही कामगिरी केली. २५ वर्षीय आकाशने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ११ चेंडूत
आकाश कुमार


नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर (हिं.स.) रणजी ट्रॉफी दरम्यान भारतीय क्रिकेट इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. तो म्हणजे ८ चेंडूत सलग ८ षटकार मारणे.

मेघालयचा फलंदाज आकाश कुमार चौधरीने ही कामगिरी केली. २५ वर्षीय आकाशने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ११ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. यासह, तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (सर्व बहु-दिवसीय सामने) अर्धशतक झळकावणारा सर्वात जलद क्रिकेटपटू ठरला आहे. आकाशने इंग्लंडच्या वेन नाईटचा १२ चेंडूंचा विक्रम मागे टाकला.

रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात आकाश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने एक डॉट आणि दोन एकेरी धावांनी आपला डाव सुरू केला. पण नंतर पुढील आठ चेंडूत सलग आठ षटकार मारले. असे करणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. त्याने फक्त ११ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

यापूर्वी सर्वात जलद प्रथम श्रेणी अर्धशतकाचा विक्रम इंग्लिश काउंटी क्रिकेट संघ लीसेस्टरशायरच्या वेन नाईटच्या नावावर होता, ज्याने २०१२ मध्ये १२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या क्लाईव्ह इनमनने १९६५ मध्ये १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

वेळेच्या बाबतीत तो सर्वात जलद अर्धशतकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आकाशने ९ मिनिटांत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर इनमनने फक्त ८ मिनिटांत आपल्या ५० धावा पूर्ण केल्या होत्या.

आकाश प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग सहा चेंडूत सहा षटकार मारणारा तिसरा क्रिेकेटपटू ठरला. गॅरी सोबर्स १९६८ मध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. त्याने ग्लॅमॉर्गन आणि नॉटिंगहॅमशायर यांच्यातील सामन्यात माल्कम नॅशने टाकलेल्या षटकात ही कामगिरी केली. त्यानंतर रवी शास्त्री यांनी १९८४-८५ मध्ये ही कामगिरी केली होती.

आकाश कुमारने १४ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. मेघालयने आपला पहिला डाव ६२८/६ वर घोषित केला. आकाश कुमारने १४ चेंडूत ५० धावा करताना सलग आठ षटकार मारले.२५ वर्षीय आकाश कुमार २०१९ पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. त्याने ३० सामन्यांमध्ये १४.३७ च्या सरासरीने ५०३ धावा केल्या आहेत.

२००७ च्या विश्वचषक ट्वेंटी२० मध्ये युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध सहा षटकार मारले. अँड्र्यू फ्लिंटॉफशी झालेल्या वादानंतर स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात त्याने सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande