
हाँगकाँग, ९ नोव्हेंबर (हिं.स.) हाँगकाँग सिक्सेस २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि कुवेत या दोन संघांमध्ये अजिंक्यपदासाठी मुकाबला रंगणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला फक्त एका धावेने पराभूत करून सलग सहाव्यांदा अंतिम फेरीत स्थान निश्चित केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अब्दुल समदच्या जलद ३४ (१३) आणि ख्वाजा नाफेच्या स्फोटक ५० (१४) च्या जोरावर दोन विकेट्स गमावून १२१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी तीन विकेट्स गमावल्या. कर्णधार अॅलेक्स रॉसच्या ८ चेंडूत ३६ आणि ख्रिस ग्रीनच्या १२ चेंडूत ४६ धावांनी संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. पण अंतिम फेरीत त्यांना प्रवेश करता आला नाही.
दुसऱ्या उपांत्य फेरीत कुवेतने इंग्लंडला ३६ धावांनी पराभव करत इतिहास रचला आणि पहिल्यांदाच हाँगकाँग सिक्सेसच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना कुवेतने मीत भावसारच्या १५ चेंडूत ६२ धावांच्या जोरावर १४२/५ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने जेम्स कोल्सच्या नाबाद ५५ (१८ चेंडूत) धावांच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला प्रतिस्पर्धी संघाला ३ बाद १०५ धावाच करता आल्या. ज्यामुळे त्यांना लक्ष्य गाठता आले नाही. अंतिम सामना आता पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होईल.
भारतीय संघाच्या मोहिमेचा शेवट निराशाजनक झाला. पहिल्या दिवशी पाकिस्तानविरुद्ध विजयाने सुरुवात केल्यानंतर, पुढील सामन्यांमध्ये संघाला कुवेत, युएई, नेपाळ आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे